
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त १० जुलै रोजी श्री गुरुपद्यपूजन.
रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप-नाचणे लिंक रोडवरील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरूपौर्णिमेनिमित्त १० जुलै रोजी श्री गुरुपद्यपूजनाच कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, नाचणे येथे सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. तसेच गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून मुलांचा गुणगौरव समारंभही होणार आहे. या कार्यक्रमाला सेवेकरी भाविक आणि रत्नागिरीकरांनी उपस्थित राहून पाद्यपूजन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.