
फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण यांनी वयाच्या ६० व्या वर्षीही मुंबईतील शिवाजी पार्क ते पणजी (गोवा) असा ५५८ किलोमीटरचा खडतर प्रवास त्यांनी अवघ्या ५ दिवसांत पूर्ण केला
सुपरमॉडेल आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण यांनी वयाच्या ६० व्या वर्षीही ‘द फिट इंडियन रन’ची ५ वी आवृत्ती यशस्वीरित्या पूर्ण केली मुंबईतील शिवाजी पार्क ते पणजी (गोवा) असा ५५८ किलोमीटरचा हा खडतर प्रवास त्यांनी अवघ्या ५ दिवसांत पूर्ण केला, ज्यात दररोज ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर धावणे (हाफ आयर्नमॅनच्या समतुल्य) असा समावेश होता.
२६ जून २०२५ रोजी सुरू झालेली ही धाव कोकण किनारपट्टीवरील निसर्गरम्य पण आव्हानात्मक मार्गावरून गेली. पेण, कोलाड, चिपळूण, रत्नागिरी आणि कणकवली यांसारख्या शहरांमधून जात ही धाव गोव्यात समाप्त झाली. या प्रवासात मिलिंद सोमण यांनी फिटनेस, मानसिक सामर्थ्य आणि एकतेचा एक शक्तिशाली संदेश दिला, ज्यामुळे हजारो लोकांना दैनंदिन आरोग्य आणि शिस्तीचे महत्त्व पटले.