
आठवडा बाजारातील विक्रेत्याला मारहाण, मालाचे नुकसान; तिघांचा गुन्हा दाखल.
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजारातील विक्रेत्याला मारहाण करत त्याच्या मालाचे नुकसान केल्याप्ररणी तीन जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार 28 जून रोजी सायंकाळी 4.30 वा.सुमारास घडली.
प्रल्हाद शंकर पावसकर (34)बाजारपेठ,रत्नागिरी),मंदार महादेव वडपकर (35) आणि दिनेश जगन्नाथ वरवडकर (तिन्ही रा.पावस बाजारपेठ,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात ब्रिजेश कुमार विश्वनाथ प्रसाद (50,सध्या रा.झारणी रोड मच्छिमार्केट,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी हे शनिवारी सायंकाळी आठवडा बाजार येथे रस्त्याच्या बाजुला महिलांचे कपडे,कटलरी व पायपूसणे यांची विक्री करत होते.त्यावेळी तीन संशयित तिथे आले, त्यांनी विक्रेता ब्रिजेश कुमारला पायपुसणीची किंमत विचारली. त्यावर त्याने शंभरला दोन असे सांगितले. परंतू संशयितांनी त्याच्याकडे शंभरला तीन पायपुसणींची मागणी केल्यावर ब्रिजेशकुमारने असे देता येत नाही असे सांगितले. याचा राग आल्याने संशयितांनी फिर्यादी विक्रेत्याची कॉलर पकडून त्याला धक्काबुक्की करुन खाली पाडले. त्यानंतर त्याचे सामान विस्कटून करत बाजुच्या स्टॉलमधील लोखंडी स्टूल उचलून त्याच्या डोक्याम मारुन दुखापत केली