
संगमेश्वरात धामणी येथे बिबट्याचा पुन्हा वावर, ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी बिबट्याचे दर्शन हाेत असून अनेकवेळेला पाळीव प्राण्यांना खाण्यासाठी बिबट्या मानवी वस्तीपर्यंत येत आहे. संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे मानवी वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचे पुन्हा एकदा समाेर आले आहे. धामणी येथील श्रद्धा हाॅटेलचे उद्याेजक प्रभाकर घाणेकर यांच्या घराजवळील सीसीटीव्ही कॅमेèयात बिबट्याने पाळलेल्या मांजरावर झडप घालून त्याला घेऊन जातानाचा प्रसंग कैद झाला आहे. या घटनेमुळे धामणी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.धामणी हे मुंबई-गाेवा राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असल्याने हाॅटेल्स आणि पेट्राेल पंपांमुळे येथे दिवसरात्र वदर्ळ असते. असे असतानाही या वदर्ळीच्या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढल्याने चिंता व्यक्त हाेत आहे.www.konkantoday.com