
गुहागर पिंपर येथे खून
गुहागर तालुक्यातील पिंपर मठवाडी येथील प्रौढाचा अज्ञाताकडून खून झाल्याची घटना घडली. पिंपर मठवाडी येथील अनंत विश्राम देवळे यांचा अज्ञाताकडून त्यांच्या कपाळावर व डोक्यावर तसेच शरीराच्या इतर भागांवर हत्याराने गंभीर दुखापत करून खून केल्याचे येथील ग्रामस्थांच्या पहाटे निदर्शनास आले. यानंतर गावचे पोलीस पाटील संजय धर्वे यांनी या खूनाची खबर गुहागर पोलिसांना दिली. मयत अनंत देवळे, मुलगी, साक्षी व मुलगा वेद हे तीघेजण राहत होते. तर पत्नी घरकामानिमित्त मुंबई येथे २ वर्षापासून वास्तव्यास आहे. रात्री तीघेजण घरामध्ये झोपले होते.
दरम्यान पहाटे मयत अनंत देवळे घरामध्ये कोठेच दिसून आले नाहीत. तसेच घराचे दारही उघडे दिसले. यानंतर ते घरामध्ये येण्याची वाट पाहूनही घरी न आल्याने अखेर त्यांच्या मुलीने आपल्या आईला वडील घरी नसल्याबाबत सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता घराच्या पाठीमागे भिंतीला लागून त्यांचे प्रेत आढळून आले.
www.konkantoday.com