शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल


शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी आरोग्यमंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.तानाजी सावंत यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आमदार तानाजी सावंत यांना दुपारी सुमारे ४.३० वाजता चक्कर येऊन उलटी झाल्यामुळे हृदयाची धडधड वाढली. यावेळी त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी हृदयाचा त्रास झाल्यामुळे रुबी हॉल रुग्णालयात तानाजी सावंत यांना दाखल करण्यात आले. आयसीयूमध्ये तानाजी सावंत यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button