
आणखी एखादा मोठा अपघात घडण्याची वाट पाहत आहात का?”, हरिहर किल्ल्यावर गर्दी पाहून लोक संतापले.
महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. प्रत्येक किल्ल्याची एक स्वतंत्र अशी ओळख आहे. या गडकिल्ल्यांना दरदिवशी हजारो पर्यटक भेट देतात. गडकिल्ल्यांच्या यादीत काही गड किल्ले असे आहेत की जे अत्यंत खडतर आहे. या गडकिल्ल्यांची उंची आणि वाट अतिशय अवघड आहे. अशा गडकिल्ल्यांची सैर करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या सोशल मीडियावर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळ असलेला हरिअर किल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याला हर्षगड म्हणून सुद्धा ओळखतात. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या किल्ल्यावर पर्यटकांनी भयानक गर्दी केली आहे.
एखादी चुक मोठ्या अपघातचे कारण ठरू शकते. सोशल मीडियावर काही लोक हा व्हिडीओ शेअर करून सत्रक राहण्याचे आवाहन करत आहे.हरिहर हा ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या चढाईसाठी ज्या पायऱ्या आहेत, त्या अरुंद आणि उभ्या आहेत. विशेषत: पावसाळ्यात या पायऱ्यांवरून पाय घसरण्याची जास्त शक्यता असते ज्यामुळे चढाई आणि उतरताना खूप धोका असतो.या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला हरिहर किल्यावरील भयानक दृश्य दिसेल. इथे पर्यटकांनी भयंकर गर्दी केली आहे. काही लोक चढताना तर काही लोक उतरताना दिसत आहे. भयंकर गर्दीत अरुंद आणि उभ्या पायऱ्यावरून लोक ये – जा करत आहे. ही मरणाची गर्दी पाहून काही लोकांना कदाचित संताप येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.आधीच २०२५ मध्ये विनाशकारी घटना घडत आहेत, त्यात आणखी एक मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहे का? अशा आशयाचे पोस्ट शेअर करत युजर्सनी लोकांना सुनावले आहे. त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.