
लांजा-राजापूर’मधील धरणांसाठी ९०० कोटींच्या निधीकरीता प्रयत्नशील -आ. किरण सामंत.
लांजा-साखरपा-राजापूर विधानसभा मतदारसंघात २६ ते २७ धरणांची कामे केली जाणार असून त्यासाठी भूसंपादन शून्य प्रक्रियेत आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात या धरणांच्या कामांसाठी लागणारा ९०० कोटींचा निधी मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार किरण सामत यांनी सांगितले.रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात आमदार किरण सामंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य शासनाच्या लवकरच सुरू होणार्या पावसाळी अधिवेशनानिमित्ताने लांजा-साखरपा राजापूर विधानसभा मतदार संघातील प्रलंबित विकासकामांबाबत आमदार किरण सामंत यांनी लक्ष वेधले आहे.हा मतदार संघ दुर्गम भाग मानला जातो. त्यामुळे येथील प्रमुख तीन नद्यांमध्ये अर्जुना मुचकुंदी, काजळी या नद्यांवरील पूल धरणांची अपुरी कामे यासाठी निधी आवश्यक आहे.तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने कर्मचारी वसाहत रस्ते, शाळा दुरुस्ती, यांच्यासाठीही मुख्यमंत्री यांच्याकडे निधीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले लांजा येथील डंपिंग ग्राऊंडप्रश्नी ठराविक लोक दिशाभूल करत आहेत अ पण जेव्हा खरी वस्तुस्थिती समोर येईल तेव्हा त्यांना या प्रकल्पाचे महत्व पटेल असेही म्हणाले.www.konkantoday.com