
विठ्ठल भक़्त दाजीबा नाचणकर यांनी सुरू केलेल्या पायी दिंडीला यंदा ५० वर्षे पूर्ण.
रत्नागिरी येथील बाजारपेठ भागात वसलेल्या आणि प्रति पंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या श्री विठ्ठल मंदिरात येणार्या व विठ्ठल भक़्त दाजीबा नाचणकर यांनी सुरू केलेल्या पायी दिंडीला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त मोठ्या प्रमाणावर दिंडीचे आयोजन करण्याचा निर्णय वारकर्यांनी घेतला आहे.विठ्ठल मंदिरात दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशिला दिंडी येत असते. सन १९७५ सालापासून विठ्ठल भक्त दाजीबा नाचणकर यांनी पुढाकार घेवून ही दिंडी भार्गवराम मंदिर येथून प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल मंदिरात आणायला सुरूवात केली. यावर्षी आषाढी एकादशीला या दिंडीला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. यंदा मोठ्या प्रमाणावर ही दिंडी आयोजित करण्याचे वारकरी संप्रदायाकडून विठ्ठल मंदिर संस्थेतर्फे कळविण्यात आले. त्यानुसार श्री विठ्ठल मंदिर संस्थेच्यावतीने रत्नागिरीमधील विविध समाजातील पदाधिकारी आणि संस्थेचे पदाधिकारी यांची एकत्र बैठक मंदिरात पार पडली.
या बैठकीला वारकरी कोटकर बुवा, रवी गुरव, राजू नेरकर, संतोष नाचणकर, दाजीबा नाचणकर यांचे पणतू संजय पतंगे, पाडाळकर, ऍड. रत्नाकर हेगिष्टे, मोहन चंदरकर आदी विविध समाजाची मंडळी श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. वारकरी संप्रदायाकडून केलेल्या सूचनेनुसार लवकरच दुसरी आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे.www.konkantoday.com




