
आषाढी वारीसाठी विठुरायाच्या दर्शनाला रत्नागिरीतून ५० बसेस रवाना होणार.
आषाढी वारीसाठी लाखो वारकरी, भाविक पंढरपूरला लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. आषाढी एकादशी अवघ्या काहीच दिवसांवर येवून ठेपले असून वारकरी, भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी आगारातून ५० एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.राज्यातून तब्बल ५ हजार ३०० बसेस विविध मार्गावरून धावणार आहेत. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी जास्तीत जास्त बुकींग करावे, असेही आवाहन एसटी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह इतर राज्यातील लाखो वारकरी, भाविक पंढरपूरला जात असतात. आषाढीनिमित्त पंढरपूरला जाणार्या भाविकांची गर्दी दरवर्षी वाढत चालली आहे. यंदाही भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले आहेत.www.konkantoday.com




