
साखरपा मुख्य बाजारपेठ असूनही रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण.
साखरपा येथे रविवारी भरणार्या आठवडा बाजारात खरेदीसाठी तब्बल ३६ गावातील ग्राहक दाखल होतात. ही बाजारपेठ पंचक्रोशीचा महत्वाचा भाग आहे. मात्र या बाजारपेठेच्या ५०० मीटर अंतरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमुळे परिसर विद्रुप झाला आहे. या मार्गाची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी पंचक्रोशीतून होत आहे.बाजारपेठेत साखरपा बसस्थानक आहे. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांची सदैव रेलचेल सुरू असते. साखरपा तिठा ते बसस्थानक मार्गावर प्रचंड खड्डे निर्माण झाले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळून येत नाही. खड्डे बुजविताना अपघातही घडत आहेत.www.konkantoday.com