
चिपळूण शहरातील कोल्हेखाजण येथे विद्युतधारित तारेचा स्पर्श झाल्याने पाच म्हशींचा मृत्यू
*चिपळूण शहरातील कोल्हेखाजण येथे तुटलेल्या विद्युत भारीत तारेचा स्पर्श झाल्याने पाच दुभत्या म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी प्रमोद पांडुरंग कदम यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्रमोद कदम यांच्या मालकीच्या म्हशी नेहमीप्रमाणे कोल्हेखाजण परिसरातील मोकळ्या जागेत चरण्यासाठी गेल्या होत्या. याचदरम्यान, महावितरणच्या विद्युत वाहक तारा अचानक कोसळल्याने पाच म्हशी जागीच मृत्युमुखी पडल्या,
या प्रकारामुळे ग्रामस्थांत संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत निष्काळजीपणाबाबत नाराजी व्यक्त केली. नुकसान झालेल्या कदम यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे