निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप आणि आय केअर हॉस्पिटल यांच्या समन्वयाने शालेय वस्तूंचे वाटप.

निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप आणि आय केअर हॉस्पिटल यांच्या समन्वयाने संगमेश्वर तालुक्यातील काही निवडक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्यात आले.शुक्रवार दिनांक २० जून २०२५ रोजी मुचरी गोरेवाडी , केंद्र शाळा सामले, देवरूख शाळा नंबर २ या शाळेत सदर कार्यक्रम पार पडला. तर शनिवार दिनांक २१ जून २०२५ रोजी अंत्रवली आणि संगमेश्वर शाळा नंबर १, २, ३ या शाळेत शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती समाज रत्न पुरस्काराने सन्मानित, उद्योजक जी. झेड . श्री टोपरे , सुवर्णाताई (सरपंच महोदया मुचरी ग्रामपंचायत,)राजाराम चव्हाण, श्री नागरगोजे -(पोलीस निरीक्षक संगमेश्वर पोलीस ठाणे,)निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन , संगमेश्वर पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र खानविलकर, अंत्रवली गावातील पोलीस पाटील सुरेश तावडे, गावकर कृष्णा मालप, पुजा लाने सरपंच महोदया कसबा ग्रामपंचायत, याशिवाय प्रत्येक शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पालक वर्ग विशेषतः महिला पालक वर्गाची उपस्थिती लक्षवेधी होती.पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोबाईलचा वापर आवश्यक त्या वेळी करावा. याचे दुष्परिणाम समजावून सांगताना समाजाची विस्कटलेली घडी या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले. सद्यस्थितीत हा संदेश विद्यार्थी दशेला नवी दिशा नक्कीच देईल असा विश्वास वाटतो आहे.या उपक्रमातून जिल्हा परिषद शाळेबाबतची उदासिनता दूर करणे. खऱ्या गरजवंताना मदतीचा हात देणे हा मूळ हेतू! माणूस हा समाजशील प्राणी पणस्वार्थीपणा इतका टोकाला गेला की माणूसपण हरवलं. हाच दुवा भक्कम करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींना आवाहन केले. याला भरभरून सहकार्य लाभले. याच जोरावर हा कार्यक्रम जनमानसांच्या पसंतीस उतरला.chiplun sangmeshwar railway facebook group konkanrailway

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button