
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा सुर्वेवाडीमधील घरातून १ लाख १० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा सुर्वेवाडीमधील घरातून १ लाख १० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी माय-लेकींवर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबत सरिता सुरेश सुर्वे यांनी देवरुख पोलीस ठाण्यात खबर दिली. सरिता सुर्वे यांनी घराच्या माळ्यावर पत्र्याच्या पेटीत सोन्याचे दागिने ठेवले होते. ५६ हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र, १३ हजार रुपये किंमतीचे कानातील टॉप्स, १० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, २७ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, ४ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या तीन अंगठ्या चोरीला गेल्याचे सरिता सुर्वे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. हा प्रकार १० सप्टेंबर २०२४ ते १० जून २०२५ या कालावधीत घडला sangmeshvarsakharpa sangmeshvarsakharpacrime