
मंडणगडात राष्ट्रीय महामार्गाचे पितळ पावसाने उघडे पाडले.
मंडणगड तालुक्यातील आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट राहिलेल्या कामाचे पितळ गेल्या काही दिवस झालेल्या मुसळधार पावसात उघडे पडले आहे. धो धो पडणार्या या पावसामुळे शेनाळे, तुळशी घाटासह विविध ठिकाणी नवीन कॉंक्रीट रस्ता खचला आहे. महामार्गावर म्हाप्रळ ते आंबवणेदरम्यान लहान मोर्या व पुलांची सर्व कामे अर्धवट राहिल्याने पर्यायी मार्गावरील वाहतूक अडचणीत आली आहे.धोकादायक वळणे, गावागावातील जोडरस्ते यामुळ समस्यांत भर पडली आहे. यामुळे सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. महामार्गाच्या चुकीच्या कामाचे अनेक किस्से रोज समोर येत आहेत. मात्र प्रशासन व ठेकेदार कंपनी स्थानिकांच्या सूचना गंभीरपणे घेत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.Mandangadnews




