
ओरोस येथे ५५ लाखांची गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा टेम्पो पकडला.
गोवा येथून मुंबईच्या दिशेने अवैधपणे गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला. यावेळी टेम्पो चालक राघोबा रामचंद्र कुंभार (वय ३५, रा.पेडणे, माऊसवाडी, ता. पेडणे, गोवा) याला अटक केली आहे. ही कारवाई गोवा – मुंबई महामार्गावरील ओरोस येथील हॉटेल राजधानी समोर सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली.
या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात चालकासह टेम्पो मालक मिलींद राणे (रा. इन्सुली, ता. सावंतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर टेम्पोची अंदाजे किंमत २५ लाख रुपये, आणि ५५ लाख ७५ हजार ६८० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु असा एकूण ८० लाख ७५ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.