
रत्नागिरी शहरानजिकच्या रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणात जिल्हा प्रशासनाला चार आठवड्यांची मुदत.
रत्नागिरी शहरानजिकच्या रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला पुढील चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. संबंधित रिसॉर्टला नुकसान भरपाई देण्यासाठी अथवा या संदर्भात आपले म्हणणे मांडण्यासाठी विलंब का झाला, या बाबतचे प्रतिज्ञापत्र येत्या १६ जुलैपर्यंत सादर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मुदत देण्यात आली आहे.रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी नुकसान भरपाई द्यावी अथवा त्यांची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाकडून देण्यात आले होते. ४ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने तत्काळ स्थगिती मिळवली. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. जिल्हा प्रशासनाने रत्नसागर प्रकरणी वेळेत आपले म्हणणे मांडले नाही अथवा या संदर्भात अपिल का केले नाही. याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने पुढील ४ आठवड्यांची मुदत दिली आहे.www.konkantoday.com