
बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज, तिघांना अटकपूर्व जामीन.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या देवरूख शाखेत बनावट कर्ज व्यवहार केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली. या संदर्भात रत्नागिरीच्या सत्र न्यायालयाने तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने रत्नागिरीतील प्रसिद्ध ऍड. भाऊ शेट्ये यांनी काम पाहिले.देवरूख येथील शाखेत बनावट कागदपत्र दाखल करून बँकेची फसवणूक केली असता आरोप ठेवून प्रथमेश शिरीष पवार आणि श्वेता शिरीष पवार (दोघेही रा. मेघी) यांच्याविरूद्ध बँकेने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यांच्याकडे एकूण ३५.२८ लाख रुपये कर्ज रकमेची थकबाकी होती. घर नसताना सातबारा उतार्यात खोटी माहिती नमूद करून बँकेची फसवणूक झाली आहे.
असे त्यात नमूद करण्यात आले होते. याशिवाय मोअज्जम महंमद साटविलकर (रा.देवरूख) यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज घेतले होते. वाहन खरेदीसाठी बिगरशेती कर्ज योजनेच्या अंतर्गत २५ आणि २८ लाख रुपये घेतले होते. जिल्हा बँकेने पोलीस अधीक्षकांकडे फौजदारी स्वरूपात कारवाई म्हणून अर्ज दिला. खोटी आणि बनावट तारण कागदपत्रे कर्ज मिळविण्यासाठी सादर केली गेली असता आरोप ठेवण्यात आला होता. या तिघांनीही अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून ऍड. भाऊ शेट्ये यांच्यामार्फत रत्नागिरीच्या सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. हा अर्ज सत्र न्यायाधीश अनिलकुमार आंबोळकर यांच्यासमोर सुनावणीस आला, उभय बाजू ऐकून घेवून न्यायाधीशांनी तिन्ही अर्जदारांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.www.konkantoday.com