
उद्योगपती पितांबरी उद्योग समुहाचे रवींद्र प्रभूदेसाईंचा २२ रोजी रत्नागिरीत सत्कार.
रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे उद्योगपती पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रविंद्र वामन प्रभूदेसाई यांचा विशेष सत्कार २२ जून रोजी करण्यात येणार आहे.टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डी लिट पदवी प्रदान करून प्रभूदेसाई यांना सन्मानित केले. या सन्मानाचा आनंद साजरा करण्यासाठी रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण संघातर्फे त्यांचा रविवारी दुपारी ४.३० वाजता शहरातील शेरे नाका येथील संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात गौरव करण्यात येणार आहे. याप्रसंगी गौरवमूर्तींच्या हस्ते कर्हाडे ब्राह्मणांचा इतिहास (पाचवी आवृत्ती) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.www.konkantoday.com