
शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश, कौशल्य चाचणी प्रवेशासाठी विभागस्तर चाचणीकरिता खेळाडूंनी २३ जूनपर्यंत अर्ज करावेत.
रत्नागिरी, दि.१९ : सन २०२५-२६ साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत ९ क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश (५०%) व कौशल्य चाचणी (५०%) प्रक्रियेअंतर्गत प्रवेशासाठी विभागस्तर चाचणीकरिता पात्रता निकषात पात्र असलेल्या खेळाडूंनी आपले अर्ज (खेळाडूचे नाव, जिल्हा, खेळप्रकार, जन्मदिनांक, वय व क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, प्लॉट नं.ओएस-१५, मिरजोळे एम. आय. डी. सी. येथे दि.२३ जून रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करावेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी क्रीडा प्रबोधिनी मध्ये सरळ प्रवेश व खेलानिहाय कौशल्य चाचणीसाठी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
अर्जा सोबत जन्म दिनांकाबाबत व क्रीडा कामगिरीबाबत आवश्यक कागदपत्रे (आधार कार्ड, जन्मप्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्रे ) सत्यप्रती जोडाव्यात. अधिक माहिती करीता क्रीडा मार्गदर्शक गणेश खैरमोडे, (९२८४३४२२१०) यांच्याशी संपर्क साधावा.
सन २०२५-२६ साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत ०९ क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश (५०%) व कौशल्य चाचणी (५०%) प्रक्रियेअंतर्गत खालील निकषानुसार निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहेत. प्रवेश प्रक्रीयेसाठी खालील प्रमाणे नियम अटी व शर्ती राहणार आहेत.क्रीडा प्रबोधिनी ठिकाणे -राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, गडचिरोली अशा ९ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती. या ठिकाणी क्रिडा प्रबोधिनी मध्ये क्रिडा प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
क्रीडा प्रबोधिनीमधील क्रीडा प्रकार – ज्युदो, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, अॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हॅन्डबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, ट्रायथलॉन, सायकलिंग, बॉक्सींग अशा १७ क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते.
प्रवेश प्रक्रीया सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी -सरळ प्रवेश प्रक्रिया : क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय १९ वर्ष आतील आहे, अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो.खेळनिहाय कौशल्य चाचणी: क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय १९ वर्ष आतील आहे, अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो.
वैद्यकीय चाचणी : उपरोक्त चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाव्दारे चाचणी घेवून क्रीडा प्रबोधिनीमध्ये शारीरिक दृष्ट्या सुदृढ खेळाडूंची निवड अंतिम करण्यात येते.
क्रीडा कौशल्य व सरळ प्रवेश चाचणी वयोमर्यादा :-दि. ०७ जुलै २००६ नंतर जन्मलेले व दि. ०८ जुलै २०२५ रोजी पर्यन्त १९ वर्ष पूर्ण झालेले खेळाडू .
सर्वसाधारण सुचना (विभाग व राज्यस्तर चाचणी करीता) – चाचण्यांकरिता येणा-या खेळाडूंनी स्वतः निवास व भोजन व्यवस्था वैयक्तिक स्तरावर करावयाची आहे. चाचण्यांकरिता येणा-या खेळाडूंनी संबंधित स्पर्धेचे प्राविण्य / सहभाग प्रमाणपत्र, वयाचा पुरावा इ माहिती चाचणीस्थळी आणणे बंधनकारक आहे. मान्यतेत निवड प्रक्रिया राबविताना सरळ प्रवेश प्रक्रियेन्वये जर इच्छुकांची संख्या ५०% पेक्षा जास्त असेल तर अशा प्रकरणी प्रथम त्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात यावा व उर्वरित जागेंवर कौशल्य चाचणीव्दारे प्रवेश देण्यात येईल. मैदानी / सायकलिंग / शुटींग या खेळकरिता राज्य निपुणता केंद्र २० वर्ष वयोगट अंतर्गत चाचणीआयोजित करण्यात येणार आहेत व उर्वरित खेळाकरिता १९ वर्षाआतील मर्यादा असेल.
मिशन लक्षवेध अंतर्गत असलेल्या खेलाकरिता मैदानी / आर्चरी / बॉक्सिंग / वेटलिफ्टिंग / हॉकी/ कुस्ती / शुटींग / टेबल टेनिस / बेडमिंटन या खेळकरिता सरळ प्रवेश (राज्यस्तर पदक किंवा राष्ट्रीय सहभाग) असलेल्या खेळाडूंची चाचणी आयोजित होतील. हॅडबॉल/ जलतरण/सायकलिंग/फुटबॉल/जुदो/जिम्नॅस्टिक्स या खेळांकरिता सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी (राज्यस्तर सहभाग असलेले खेळाडू) अश्या दोन्ही प्रक्रियेद्वारे चाचण्या आयोजित करण्यात येईल. मैदानी / सायकलिंग / शुटींग या खेलाकरिता राज्य निपुणता केंद्र २० वर्ष वयोगट अंतर्गत चाचणीआयोजित करण्यात येईल, उरलेल्या खेळकरिता १९ वर्षाआतील मर्यादा असेल.
८. एखाद्या खेळात राज्यभरात विभागनिहाय चाचणी करिता खेळाडूंची संख्या कमी आल्यास सदर खेळाची चाचणी विभागस्तरावर आयोजित न करता सरळ राज्यस्तरावर होईल,विभागस्तरावर चाचण्याचे आयोजन दिनांक २५ ते २६ जून २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच विभागस्तरावर निवड झालेल्या खेळाडूंची राज्यस्तर चाचणी दि. ०५ जुलै ते ०८ जुलै २०२५ या कालावधीत खेळनिहाय राज्यातील विविध क्रीडा प्रबोधिनीच्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. 000