बांगलादेशी घुसखोरांना नेणाऱ्या पोलिसांच्या 4 गाड्यांची धडक, 20 जण जखमी


मुबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर भातण बोगद्यानजीक एक अपघात झाला. बुधवारी सकाळी 8.15 च्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये 20 पोलीस जखमी झाले आहेतमुंबईहून पुण्याला बांगलादेशी घुसखोरांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठा साखळी अपघात झाला. आज सकाळी सुमारे 8.15 वाजता नवी मुंबई कंट्रोल रूमकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली होती. अपघातामध्ये जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे कळते आहेसकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या रस्त्यावर मोठा कंटेनर उलटला होता. यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. हा कंटेनर हटविण्यासाठी हायड्रा मशीन मागवण्यात आली होती. कंटेनर हटवला जात असताना या हायड्रा मशीनला एक आयशर टेम्पो धडकला होता. यामुळे एक लेन पूर्णपणे बंद झाली होती.अपघातांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये बांगलादेशी घुसखोरांना पुण्याला नेणारी पोलिसांची वाहनेही अडकली होती. यामधील पोलिसांचे एक वाहन एसटी बसला धडकले होते. पोलिसांच्या त्या वाहनाला मागून येणाऱ्या पोलिसांच्या इतर गाड्या धडकल्या. पोलीस व्हॅनपाठोपाठ येणारी एस्कॉर्ट स्कॉर्पिओदेखील आदळली होती. या साखळी अपघातामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button