
सुंदर मी होणार’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अमोल बावडेकरला रविवारी प्रयोगाआधी हृदयविकाराचा झटका
सुंदर मी होणार’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अमोल बावडेकरला रविवारी प्रयोगाआधी हृदयविकाराचा झटका आल्याने या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला. हा प्रयोग विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता.सध्या अमोल बावडेकरची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली आली आहे.
या नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. अमोलच्या प्रकृतीबद्दल समजल्यावर रविवारचा प्रयोग तात्काळ रद्द करण्यात आला आणि निर्मात्यांनी प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत केले. आता अमोलच्या जागी पुढचे काही दिवस या नाटकात अभिनेता अनिरुद्ध जोशी झळकणार आहे, असं दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं आहे.
दिग्दर्शक पोस्ट शेअर करत लिहितात, “रविवारी सकाळी ‘सुंदर मी होणार’ या नाटकाच्या प्रयोगाला काही तास उरले असतानाच अभिनेते अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा झटका आला.




