
लोटे येथील सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेडचे डॉ. सतीश वाघ फार्मास्युटिकल्स लीडर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित.
खेड तालुक्यातील लोटे येथील सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सतीश वाघ यांना नवभारत ग्रुपच्या वतीने नुकतेच हेल्थकेअर समिट २०२५ मध्ये फार्मास्युटिकल लीडर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे आयोजित हेल्थकेअर समिट २०२५ या कार्यक्रमात हा पुरस्कार डॉ. सतीश वाघ यांच्याकरिता हार्दिक वोरा यांनी स्वीकारला.
डॉ. सतीश वाघ या कार्यक्रमाच्या वेळी मुंबई बाहेर असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत म्हणून त्यांच्या विनंतीवरून हार्दिक वोरा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. एक सर्वसामान्य रासायनिक कारखानदार ते आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल लीडर असा डॉ. वाघ यांचा जीवन प्रवास हा औषध निर्मिती क्षेत्रात जगाच्या नकाशावर देशाचे नाव ठळकपणे करणारा आहे त्याचप्रमाणे भविष्यातील भारतीय उद्योजकांना प्रेरणा देणारा आहे. वर्ल्ड केमिक्सिचे अध्यक्ष म्हणून काम पाहताना त्यांनी औषध निर्मिती क्षेत्रात आपल्या देशाला सन्मानाचे स्थान मिळवून दिलेले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने नवभारत ग्रुपने त्यांना फार्मास्यूटिकल लीडर ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.www.konkantoday.com