
राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याबाबत प्रकाशित झालेल्या बातमीसंदर्भात बांधकाम विभागाचा खुलासा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याबाबत प्रकाशित झालेल्या बातमीसंदर्भात खालील खुलासा करण्यात येत आहे.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व त्याचा चबुतरा पूर्णपणे मजबूत, सुरक्षित आणि सुस्थितीत आहे. सदर चबुतऱ्याला कोणतीही संरचनात्मक नुकसान झालेले नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांची नियमित देखभाल आणि सुरक्षा परीक्षण या विभागामार्फत नियमानुसार सातत्याने करण्यात येते. तथापि, दि. १४ व १५ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चबुतऱ्याच्या बाजूने भरलेला मातीचा भराव (Backfilling) किंचित प्रमाणात खचला आहे. याचा चबुतऱ्याच्या मुख्य रचनेवर किंवा पुतळ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही.
सदर खचलेला भाग तात्काळ दुरुस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरु करण्यात आल्या असून, हे काम अत्यंत तत्परतेने या विभागाकडून करण्यात येत आहे. हे माहिती व प्रसिद्धीसाठी सविनय
सादर.
महेंद्र पां. किणी) कार्यकारी अभियंता,
सा. बां. विभाग,
सावंतवाडी.




