गोळप माने वाडी येथे डोंगर कोसळला


शुक्रवारी पावस गोळप परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली होती.गोळप माने वाडी येथे डोंगर कोसळला. यात 8 घरातील लोकांना स्थलांतरीत व्हा असे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.काही मोटारसायकल मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्या आहेत.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही असे प्रशासनाने कळवले आहे.

तर मध्यरात्री बाजारपेठेत काही घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी आले होते. अडीवारे आणि परिसरातही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. अनेक वर्षांनंतर अडीवारे येथील प्रसिद्ध महाकाली देवीच्या आवारात पाणी भरले होते, अनेक मार्गावर सुद्धा पाणी साचलेले दिसून आले. पावस व आडिवरे परिसरात नदीच्या बाजूला असलेल्या घरात पाणी जाण्याच्या घटना घडल्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button