
रत्नागिरी जिल्ह्यातील ६७ धरणांपैकी ९ धरणे आताच १०० टक्के भरली
मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सलग पडलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांच्यापाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ६७ धरणांपैकी ९ धरणे आताच १०० टक्के भरली असून, १४ धरणांमध्ये ७५ टक्के तर १३ धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे.सध्या अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र, पाऊस थांबल्यानंतर उष्णतेत वाढ होत असल्याने पाऊस लांबला तर पुन्हा धरणांच्या पाणी पातळीत घट होण्याची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६८ धरणे आहेत. त्यापैकी नातूवाडी (ता. खेड), गडनदी (ता. संगमेश्वर) आणि अर्जुना (ता. राजापूर) हे तीन मध्यम प्रकल्प आहेत