
फडणवीस बाप आहेत, बोलण्याची गरज नाही, मंत्री नितेश राणे यांच्या पाठोपाठ भाजपा आमदार विक्रांत पाटील यांचे वक्तव्य.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी मत्स्य व बंदर विभाग मंत्री नीतेश राणे यांना घरचा आहेर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत ते बाप आहेत, असे बोलण्याची काही गरजच नाही, कारण देवाभाऊ हे महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या हृदयात स्थान प्राप्त करणारे नेतृत्व असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे जनतेसाठी पालकाच्या नेतृत्वातच ते काम करत असल्याचे सांगितले. नमस्कार मोदी-११ या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील हे बुधवारी रत्नागिरीत आले होते. यावेळी येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत उपस्थित होते. प्रत्येक व्यक्तीचा उद्धार या तत्वानुसार ११ वर्षात पीएम मोदी यांनी या १२ कामांद्वारे नव्या भारताची मुहूर्तमेढ रोवली आहे. नरेंद्र मोदी सरकारची ९ जून रोजी ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बदलत आहे आणि वेगाने हा बदल आहे. लोकांचा आत्मविश्वास, सरकारवरील त्यांचा विश्वास आणि नव्या भारताच्या खुणा जागोजागी दिसत आहेत. साल २०१४ पासून भारताच्या कल्याणकारी योजना अंत्योदय, देशाच्या प्रत्येक व्यक्तीचे उत्थान व विकास निश्चित करण्याचा सिद्धांत निर्देशित करीत आहे. या तत्वज्ञानाने समावेशक सक्षमीकरणाचा एक आदर्श बदल घडवून आणला आहे. सरकारने प्रत्येक प्रमुख योजनेत १०० टक्के समृद्धतेचे लक्ष्य ठेवल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.www.konkantoday.com