
चिपी विमानतळावरून सिंधुदुर्गवासीयांना थेट विमानाने हैद्राबाद व बेंगळूर या दोन महत्वाच्या शहरांना जाण्याची सुविधा उपलब्ध
चिपी विमानतळावरून सिंधुदुर्गवासीयांना थेट विमानाने हैद्राबाद व बेंगळूर या दोन महत्वाच्या शहरांना जाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे
फ्लाय-91′ या गोवा स्थित प्रादेशिक विमान कंपनीने सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळावरून हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू केली आहे. ही सेवा आठवड्यातून चार वेळा उपलब्ध आहे.सध्या या कंपनीची सिंधुदुर्ग-पुणे ही विमानसेवा सुरू असून त्यात आणखी या दोन नवीन मार्गांचा समावेश झाला आहे. यामुळे सिंधुदुर्गवासीयांना थेट विमानाने हैद्राबाद व बेंगळूर या दोन महत्वाच्या शहरांना जाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर, आरामदायक आणि अखंड करण्याच्या उद्देशाने ‘फ्लाय-91’ ने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कंपनीने सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळ ते गोवा (पणजी) दरम्यान मोफत कोच सेवा सुरू केली असून, त्यामुळे प्रवाशांना अंतिम गंतव्यापर्यंत पोहोचणे अधिक सुलभ झाले आहे.
गोवा मार्गे सिंधुदुर्ग विमानतळाशी जोडणार्या या कोच सेवेची सुरुवात ही त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण आणि विचारपूर्वक पाऊल आहे, असे ‘फ्लाय-91’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज चाको यांनी या कोच सेवेच्या शुभारंभ प्रसंगी सांगितले.