
मिर्या किनार्यावर अडकून बसलेल्या ’बसरा स्टार’ची विल्हेवाट पावसाळ्यानंतरच लागणार.
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिर्या किनार्यावर अडकून पडलेल्या बसरा स्टार जहाजाचे समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात दोन तुकडे झाले आहेत. ३५ कोटींचे हे महाकाय जहाज समुद्राच्या खार्या पाण्याने आणि लाटांच्या मार्याने सडले होते. अवघ्या दोन कोटींमध्ये ते भंगारात काढले जाणार आहे. शिपिंग कॉर्पोरेशन कंपनी कस्टम आणि मेरिटाईम बोर्डाच्या कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. मात्र तुकडे झालेले हे जहाज या किनार्यावरून बाजूला करण्यासाठी केल्या जात असलेल्या हालचालींसमोर सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे खवळलेल्या समुद्राचा अडसर उभा राहिला आहे. या जहाजाचे तुकडे बाजूला ओढून नेण्यासाठी मोठ्या टगची आवश्यकता आहे. हे टग आता सप्टेंबरनंतर खवळलेल्या समुद्राची स्थिती शांत होत आल्यावर या जहाजाचे तुकडे बाजूला केले जाणार आहेत. तोपर्यंत त्या जहाजाच्या तुकड्यांना दोरखंडाने बांधून ठेवण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.www.konkantoday.com