
रेशन कार्ड 12 अंकी डिजिटलायझेशन उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना मदत.
रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने तहसीलदार रत्नागिरी यांच्या सहकार्याने रेशन कार्ड डिजिटलायझेशनसाठी विशेष माेहीम राबवली. यावेळी 46 कार्ड धारकांची कार्ड 12 अंकी झाली. तसेच अन्य 35 लाेकांना पुरवठा निरीक्षण अधिकारी निशा पाईकराव यांनी मार्गदर्शन केले. रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या या लाेकाेपयाेगी उपक्रमाबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाèयांना धन्यवाद देण्यात आले. ज्या नागरिकांची कार्ड्स अद्यापही 12 अंकी झालेली नाहीत त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन संघांचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी केले आहे.www.konkantoday.com