
दापोली तालुक्यात गुरे वाहतूक प्रकरणी एकास पोलीस कोठडी.
दापोली तालुक्यातील विसापूर येथील समशेर अली नगर मोहल्ल्यात सुमारे २९ जनावरे कोंडून ठेवण्यात आली होती. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.मोहल्ल्यामध्ये हनीफ शेख अली मालवणकर याच्या घरालगत असणार्या जंगलमय भागात देखील पोलिसांनी तपासणी केली असता ३ गोवंश जनावरे कत्तल करण्यासाठी बांधून ठेवलेली आढळून आली. गोठ्यातील व जंगलमय भागातील एकूण १० बैल व १५ गाई व ४ वासने अशा तब्बल २९ जनावरांची सुटका यावेळी करण्यात आली व त्यांना गोशाळेमध्ये जमा करण्यात आले होते. न्यायालयाने मालवणकरला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती परंतु तपास कामात आणखी आवश्यकता असल्याने पोलीस कोठडी वाढवली आहे.www.konkantoday.com