
कुस्ती शिबिरातून अधिक चांगले डावपेच शिकायला मिळतात – क्रीडा अधिकारी.
रत्नागिरी: नियमित सरावाबरोबरच कुस्ती शिबिरातून अधिक चांगले डावपेच शिकायला मिळतात. टेरव येथे कुस्ती शिबिर आयोजित करुन खेळाडूंना नविन डावपेच शिकवले. कुस्ती असोसिएशनकडून हा अत्यंत चांगला उपक्रम राबवण्यात आला आहे. खेळाडूंविषयी असणाऱ्या योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहचवून गावागावात व्यायामशाळा निर्माण व्हायला हव्या, असे प्रतिपादन टेरव येथील शिबिराच्या समारोप कार्यक्रमात जिल्हा क्रिडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले.रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनतर्फे दहा दिवसांचे कुस्ती शिबिर टेरव, चिपळूण येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी चिपळूण तालुक्यातील कुस्तीपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिरात कुस्तीचे नवनवीन डाव तसेच तंत्रशुध्द प्रशिक्षण अनुभवी प्रशिक्षकांच्या माध्यमातून घेण्यात आले. या दहा दिवसीय कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा समारोप कार्यक्रम नुकताच टेरव, चिपळूण येथे संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलनकर, कार्यवाह सदानंद जोशी, टेरवचे सरपंच किशोर कदम, उपसरपंच रिया म्हालीम, क्रिडा प्रशिक्षक वैभव चव्हाण उपस्थित होते. यावेळी शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी उद्योजक सुदाम साळवी, ग्रामपंचायत सदस्य संतोष मोहीते, माजी उपसरपच अनंत चांदिवडे, ग्रामपंचायत कर्मचारी निलम साळवी, मानसी दाभोळकर, सचिन कदम, विनोद खापरे, बळवंत कदम, समिक्षा कदम, संतोष म्हालीम, विजय जोगले, वनिता पालकर आदी टेरवचे नागरिक मोठ्या उपस्थित होते.