
गांजा प्रकरणात पोलीस तपासात आणखी काही लोकांची नावे निष्पन्न.
गांजा वाहतूक प्रकरणात सहभाग असलेल्या कमलेश सदाशिव जंगम (२१, रा. नालासोपारा-पालघर) याला येथील पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर संशयितांचे आणखी कारनामे समोर येत आहेत. अटकेतील संशयिताच्या मोबाईलमध्ये ५ जणांच्या नावांचा उल्लेख असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.या ५ जणांनाही त्याने गांजाचा पुरवठा केला असून उपलब्ध माहितीच्या आधारे येथील पोलीस ‘त्या’ पाचजणांच्या मागावर असल्याचे समजते.
मुख्य सूत्रधार ओडिशा येथील असून त्याचाही पोलिसांकडून शोध सुरूच आहे.गांजा वाहतूक प्रकरणी कमलेश उर्फ सुजल उर्फ रंजीत विचारे (२०, नालासोपारा, मूळगाव शिवतर-दत्तवाडी, खेड), रवींद्र प्रेमचंद खेरालिया (२५, उत्तरप्रदेश, सध्या मिरारोड-ठाणे) यांना गजाआड केल्यानंतर आणखी दोघांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. यातील एकाकडे ओडिशातील रेल्वे प्रवासाचे तिकीट देखील सापडल्याचे समजते.दोन्ही संशयितांना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे