
रेल्वे दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) धडक मोर्चा
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) धडक मोर्चा काढण्यात आला. गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मनसेचा मोर्चा सुरू होता. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला.या मोर्चात मनसेच्या अविनाश जाधवांसह ठाणेकर आणि रेल्वे प्रवासीसुद्धा सहभागी झाले आहेत. “दरदिवशी रेल्वे अपघातात वीस प्रवाशांचा मृत्यू होतो. यावर लवकरात लवकर उपाय काढण्यासाठी आणि योजना राबविण्यासाठी आम्ही रेल्वे प्रशासनाला ताकिद दिली. गेल्या 15 वर्षांत 51 प्रवाशांचा रेल्वे अपघाता मृत्यू झाला. त्याला कोण जबाबदार आहे”, असा सवाल अविनाश जाधव यांनी केला. संभावित अपघात होण्याची शक्यता लेखी पत्राद्वारे तीन महिन्यांपूर्वीच वर्तवली असताना रेल्वे प्रशासनाने त्यावर काय कारवाई केली, याची लेखी माहिती सादर करण्याची मागणीही मनसेनं केली.