
ठाकरे बंधूंनी एकत्र यावं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. बॅट-बॉल खेळावं की बॅडमिंटन खेळावं, हा त्यांचा प्रश्न- आमदार निलेश राणे.
ठाकरे बंधूंनी एकत्र यावं किंवा नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. ज्यांना भीती वाटत असेल आणि ते एकत्र येत असतील तर आम्ही काय करणार, अशा शब्दांत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार नीलेश राणे यांनी उत्तर दिले.
शिंदेसेनेचे मालवणचे आमदार नीलेश राणे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांची निवेदने स्वीकारून प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. बॅट-बॉल खेळावं की बॅडमिंटन खेळावं, हा त्यांचा प्रश्न असल्याचे राणे म्हणाले.चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामासंदर्भात ते म्हणाले की, लोकांच्या प्रश्नांसंदर्भात खासदार नारायण राणे यांनी लक्ष घातले असून, ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करीत आहेत. या प्रश्नाबाबत लवकरच तोडगा काढण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत, असे त्यांनी सांगितले.