
रत्नागिरीत जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता: नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) मुंबईने आज रात्री १० वाजता जारी केलेल्या ‘नाऊकास्ट’ चेतावणीनुसार, पुढील ३-४ तासांत महाराष्ट्रातील नांदेड, धाराशिव, सोलापूर, रत्नागिरी आणि बीड जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या काळात ३०-४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने नागरिकांना घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः या जिल्ह्यांमधील रहिवाशांनी सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. विजेच्या गडगडाटासह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे झाडे पडणे किंवा इतर दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या बदलत्या हवामानामुळे शेतीकामावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनानेही योग्य ती तयारी ठेवावी, असे म्हटले जात आहे.