
कर्करोग निदान व्हॅनद्वारे आयोजित केलेल्या शिबिरात आढळले ३४ संशयित रुग्ण.
आत्याधुनिक कर्करोग निदान व्हॅनद्वारे नुकतीच कामथे, सावर्डे, खेर्डी, रामपूर येथील ५६४ संशयितांची कर्करोग तपासणी करण्यात आली. यामध्ये ३४ संशयित रुग्ण आढळले आहेत.आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी व कर्करोगाचे लवकर निदान होऊन उपचार सुलभ करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने ही तपासणी मोहीम हाती घेतली होती. मे. मेडिऑन हेल्थकेअर यांच्याकडून कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत कर्करोग व्हॅन प्राप्त झाल्याने त्याद्वारे तपासणी – करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ कामथे उपजिल्हा रुग्णालयात आमदार शेखर निकम यांच्याहस्ते करण्यात आला. त्यानंतर वरील चार ठिकाणी ५६४ संशयितांची तपासणी करण्यात आली असता त्यात तोंडाच्या कर्करोगाचे ११, गर्भाशय मुखाचे २१ व स्तनाच्या कर्करोगाचे २ संशयित रुग्ण आढळले आहेत.www.konkantoday.com