
वंदे भारतच्या पावसाळ्यातून सहा दिवस नव्हे तर फक्त आठवड्यातून तीनच फेर्या.
कोकण मार्गावरून धावणार्या सीएसएमटी-मडगांव वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांच्या मिळणार्या उदंड प्रतिसादामुळे पावसाळ्यातही आठवड्यातून ६ दिवस चालवण्यात यावी, अशी कोकण विकास समितीने मागणी केली होती. या सुपरफास्ट एक्सप्रेसला अतिरिक्त रेक उभा करून ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने फेर्या वाढवणे अशक्य असल्याचे स्पष्टीकरण मध्य रेल्वे प्रशासनाने दिले आहे.कोकण मार्गावर धावणारी २२२२९/२२२३० क्रमांकाची सीएसएमटी-मडगांव वंदे भारत एक्सप्रेस पावसाळ्यात ३ दिवस थांबते. एक्सप्रेस आठवड्यातून ६ दिवस चालवण्यासाठी कोकण विकास समितीने आग्रह धरत पाठपुरावाही सुरू ठेवला होता. मध्य रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य होणार नसल्याचे स्पष्ट करत एक्सप्रेस पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तर परतीच्या प्रवासात मंगळवार, गुरूवार व शनिवारी हे तीनच दिवस धावेल. आठवड्यातून मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या ४ दिवस धावते. पावसाळी वेळापत्रकानुसार शुक्रवार व रविवारी तर परतीच्या प्रवासात शनिवारी व सोमवारी धावेल. २२११९/२२१२० क्रमांकाची सीएसएमटी-मडगांव तेजस एक्सप्रेस सोमवार आणि गुरूवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. पावसाळी वेळापत्रकानुसार मंगळवार, गुरूवार व शनिवारी तर परतीच्या प्रवासात बुधवार व रविवारी थांबेल.www.konkantoday.com