
एक पेड माँ के नाम… जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रत्नागिरी नगर परिषदेतर्फे सुरुवात
रत्नागिरी – आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रत्नागिरी नगरपरिषद तर्फे अमृत 2.0 माझी वसुंधरा व DAY-NULM संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम आनंद नगर येथे करण्यात आला. यावेळी एक पेड माँ के नाम या शासनाच्या उपक्रमाचा शुभारंभ रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या उपक्रमांतर्गत 25 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती श्री. गारवे यांनी दिली. याप्रसंगी अभियान व्यवस्थापक संभाजी काटकर, समूह संघटक सारिका मिरकर, रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्व सीआरपी व बचत गटातील महिला उपस्थिती होत्या.