
केंद्राकडून कोरोना अलर्ट, देशात ४ हजार रुग्ण; मार्गदर्शक सूचना जाहीर
देशभरात कोरोना संसर्गामध्ये वाढ होत होतेय. देशात चार हजारांवर रुग्णसंख्या पोहचली आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यायत. या मार्गदर्शक सूचनांच्या कार्यवाहीसाठी महाराष्ट्रातील आरोग्य विभागानं पाऊल उचललंय. कारण राज्यातही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५०० झालीये. आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यास सुरुवात केलीय.वृद्ध आणि रोग-प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनी मास्क वापरा
श्वसन विकाराच्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवा, सर्वेक्षण करा
पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी तपासणीसाठी पाठवा
राज्यभरात रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश
ऑक्सिजन, पीपीई कीट, व्हेंटिलेटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा
केंद्राकडून परदेशातील प्रवासाबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. पाच देशांमध्ये प्रवास करणं टाळा असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग, अमेरिका या देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतेय. त्यामुळे तिथे प्रवास टाळा. जर प्रवास अटळ असल्यास कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याचा सल्ला केंद्र सरकारकडून देण्यात आलाय.