
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे जिल्हा परिषद ठाकरे गटाची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न…
*रत्नागिरी तालुक्यात शिवसेना नेते सचिव तथा मा.खासदार श्री विनायकजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा परिषद गट निहाय संपर्क दौरा कोतवडे जिल्हा परिषद गटात मोठ्या संख्येने प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित राहून माजीआमदार श्री बाळासाहेब माने व तालुकाप्रमुख श्री शेखर घोसाळे, जिल्हा समन्वयक श्री संजय पुनसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रत्येक गावातील शाखाप्रमुख, गटप्रमुख, बुथप्रमुख, बीएलएल यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूका समोर असल्यामुळे सर्वांनी प्रत्येक घराघरापर्यंत जावून मतदारांच्या व शिवसैनिकांच्या गाठीभेठी करण्यास सुरुवात करावी. जेणेकरुन मतदारांचे स्थानिक प्रश्न आपल्या संघटनेच्या माध्यमातून सोडविता येतील. त्यांच्या अडी-अडचणी सोडविता येतील. त्यामुळे प्रत्येकांनी कामाला सुरुवात करावी अशा सुचना सदर बैठकीत देण्यात आल्या. त्यावेळी उपस्थित तालुकासंघटक तथा मा.पंचायत समिती सदस्य श्री दत्तात्रय मयेकर, शहरसंघटक श्री प्रसाद सावंत, युवासेना तालुका अधिकारी संदेश नारगुडे, युवासेना तालुका समन्वयक श्री साईनाथ जाधव, उपतालुकाप्रमुख श्री प्रकाश जाधव, श्री महेंद्र चव्हाण, विभागप्रमुख श्री उत्तम मोरे, किरण तोडणकर, नयन साळवी, मयुरेश पाटील, विभागसंघटक श्री प्रविण साळवी, उपविभागप्रमुख श्री गजानन गिड्ये, नंदकुमार कदम व मोठ्या संख्येने शाखाप्रमुख, गटप्रमुख, बुथप्रमुख, बीएलए व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.