
रत्नागिरी शहरात एकता मार्गावरील बागेजवळ वडाच्या झाडाखाली सापडला प्राण्याचा पाय,
रत्नागिरी शहरात एकता मार्गावरील बागेजवळ गोवंशय सदृश्य प्राण्याचा पाय व मांस आढळल्याने एकच खडबड उडाली आहे मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन हे मांस व पाय ताब्यात घेऊन नेमके कोणत्या प्राण्याचे आहे हे तपासणीसाठी पाठविले आहे
एकता मार्गावरील बागेजवळच्या वडाच्या झाडाखाली एका प्राण्याचा पाय सापडला होता त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केल्यानंतर एका बिल्डिंगच्या वॉचमनच्या घरी काही संशयास्पद वस्तु सापडल्याचे कळते
दरम्याने रात्री गो रक्षक व भाजप चे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर शहर पोलीस स्टेशन मध्ये हजर झाले होते याबाबत पोलीस तपास सुरू आहे