रत्नागिरीचा अविराज गावडे गाजवतोय इंग्लंडचे मैदानकौंटी स्पर्धेत दुसर्‍यांदा पटकावला सामनावीर पुरस्कार


रत्नागिरीचा अविराज अनिल गावडे हा सध्या इंग्लंड येथे क्रिकेटच्या कौंटी स्पर्धात मिडलसेक्स संघाकडून खेळत असून त्याच्या सततच्या चांगल्या कामगिरीमुळे इंग्लंडमध्येही तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अविराज याने हर्लिग्टन मिडोज या संघाविरुद्ध खेळताना विजयी खेळी केली. त्याने ५३ बॉलमध्ये १४ चौकार मारून ७० धावांची धावसंख्या उभारून आपल्या मिडलसेक्स संघाला विजय मिळवून दिला. फलंदाजीबरोबरच अविराज याने आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करून ९ ओव्हर्स टाकून प्रतिस्पर्ध्याच्या दोन विकेटस घेतल्या. याशिवाय त्याने क्षेत्ररक्षणात दोन अप्रतिम झेल घेतले. तसेच त्याने दोन खेळाडूंना डायरेक्ट थ्रो करत रनआऊट केले. अविराज याच्या अष्टपैलू खेळामुळे मिडलसेक्स संघ विजयी झाला. त्यामध्ये अविराज याचा सिंहाचा वाटा होता. त्याच्या कामगिरीमुळे या सामन्यामध्ये त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. याआधीही एका सामन्यात आपल्या लक्षणीय कामगिरीमुळे अविराज याला सामनावीर पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे अविराज सध्या तरी रत्नागिरीचे नाव इंग्लंडच्या मैदानात गाजवत आहे एवढे निश्‍चित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button