संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा म्हणून शिष्टमंडळाने घेतली खासदार नारायण राणे यांची भेट. थांबा मंजुरीचा मार्ग होणार मोकळा

सायले▪️निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या पुढाकाराने संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात मडगाव, जामनगर, पोरबंदर या तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा यासाठी गेल्या दीड वर्षापासून स्थानिक लोकप्रतिनिधीं, सर्व सामान्य जनतेला सोबत घेऊन निवेदन,आंदोलन, उपोषण,असे मार्ग अवलंबले.

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, बेलापूर येथील कार्यालयात निवेदन दिली. प्रत्यक्षात संघटनेचे शिष्टमंडळ चर्चेसाठी को.रे. च्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटले. भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या संगमेश्वर रोड स्थानकावर अन्याय का? ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करुन थांबा मिळावा म्हणून वारंवार विनंती करण्यात आली परंतु नेहमी केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे बोट दाखवत त्यांच्याकडून मंजुरी मिळण्यास उशीर होत असल्याचे कोकण रेल्वेकडून वारंवार सांगण्यात येते होते.

अखेर हा विषय मांडण्यासाठी खासदार नारायण राणे यांची दिनांक २८ मे २०२५ रोजी मुंबई येथे शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी संघटनेतर्फे श्री. दीपक पवार, श्री. संतोष पाटणे, श्री. मुकुंद सनगरे व श्री अशोक मुंडेकर हे उपस्थित होते. आपण आठवड्यात दिल्ली येथे रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन मंजुरीचा मार्ग मोकळा करुन देण्याचे वचन नारायण राणे यांनी या भेटी दरम्यान शिष्टमंडळाला दिले असल्याने आता तीन गाड्यांच्या थांब्याच्या मागणीची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या संघटनेने सांगितले आहे.आता लवकरच आपल्या मागण्या मान्य होणार! संगमेश्वर येथील रेल्वे प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकर होणार. असा विश्वास निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या सर्व सदस्यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button