
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली घाटात खासगी आराम बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली घाटात गुरुवारी सावंतवाडीकडून मुंबईकडे जाणार्या खासगी आराम बसने (क्र. एम.एच.४८ डीसी ९४३९) चिपळूणहून संगमेश्वरकडे जाणार्या दुचाकीला (क्र. एम.एच. ०८ टीसी १४७) दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारे गंभीर जखमी झाला. गुरुवारी रात्री ११ वा.. सावंतवाडीहून मुंबईकडे जाणार्या खासगी आराम बसने शिंदेंआंबेरीनजीक आरवली घाटात चिपळूणहून संगमेश्वरकडे जाणार्या दुचाकीस्वारास धडक देत उडवले. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.याचवेळी चिपळूणकडून येणार्या तुरळ येथील विक्की आंबूर्ले यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जितेंद्र चव्हाणना फोन केला. जितेंद्र चव्हाण, मिलिंद चव्हाण तसेच चैतन्य परकर हे घटनास्थळी दाखल झाले व संगमेश्वरातील खासगी रुग्णवाहिका बोलावून व पोलिसांना खबर देत जखमीस डेरवण येथे दाखल केले. सहा. पो.नि. शंकर नागरगोजे हे सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. गाडीत ३५ प्रवासी होते. नागरगोजेंनी या प्रवाशांची पुढच्या प्रवासाची व्यवस्था केल्याने रात्री २ वा. प्रवासी मुंबईकडे रवाना झाले.www.konkantoday.com