
श्री सत्यसाईंचा रथ ५ जूनला रत्नागिरीत आगमन होणार
श्री सत्यसाईबाबांचा प्रेम व शांतीचा संदेश घेऊन आंध्रप्रदेश येथून निघालेल्या साईरथाचे ५ जून रोजी सायंकाळी रत्नागिरीत आगमन होणार आहे. शहरातील गजानन महाराज मंदिर येथे साईरथ वास्तव्यासाठी असणार आहे. ६ जून रोजी साईरथ शहरात विविध ठिकाणी फिरणार आहे. भाविकांना यावेळी दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. सायंकाळी विविध कार्यक्रम, कस्तुरी रंगनाथन यांचे व्याख्यान, नंतर गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. तसेच यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी त्याचा लाभघ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.www.konkantoday.com