
वादळी पावसामुळे मच्छिमारांचे नुकसान, भरपाईची मागणी.
पावसामुळे व वादळी वार्यांमुळे सुमारे ३ ते ४ आठवडे मच्छीमारी बंद आहे. यामुळे झालेली नुकसान भरपाई सरकारच्या नवीन धोरणानुसार शेतकर्यांप्रमाणे मच्छीमारांना मिळावी, अशी मागणी गुहागर वेलदूर सहकारी मच्छी व्यावसायिक संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, गेली काही वर्षे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मासेमारी हंगाम अत्यंत कमी प्रमाणात झाला. गेली काही वर्षे दुष्काळ सदृश परिस्थिती असतानाही दुष्काळ जाहीर केलेला नाही. यावर्षीचा मासेमारी हंगाम ३० ते ४ आठवडे अगोदरच संपला.
किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहत आहेत. त्यामुळे मच्छीमारांना सुमारे ३ ते ४ आठवडे मासेमारी करता न आल्यामुळे फार मोठे नुकसान झाले. चालू मासेमारी हंगामामध्ये अत्यंत अल्प प्रमाणात मासेमारी झालेली आहे. अशा परिस्थितीत सुमारे चार आठवडे मच्छीमारांचे वाया गेल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्याची एकत्रित मत्स्योत्पादनाची आकडेवारी सरकारमार्फत दाखवली जाते. दरवर्षी मत्स्योत्पादनात वाढ दाखवण्यात येते. मात्र ही वाढ विशिष्ठ प्रकारच्या मासेमारी पद्धतीमुळे पर्ससिनेटमुळे दिसण्यात येते. तरी किनारपट्टीवरील मच्छीमारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन सरकारच्या नवीन धोरणानुसार शेतकर्यांप्रमाणे मच्छीमारांनाही नुकसान भरपाई मिळण्यासाठीचां निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आंली आहे.www.konkantday.com