
शैक्षणिक होर्डिंग्ज हटवू नयेत, प्राचार्य डॉ. भारत कर्हाड यांची मागणी.
रत्नागिरी जिल्ह्यात अनधिकृत व अनावश्यक होर्डिंग्ज हटविण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी प्रशासनाला दिले आहेत. हे पाऊल जिल्ह्याच्या सौंदर्यीकरणासाठी निश्चितच योग्य आहे. मात्र यामध्ये शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस यांच्या शैक्षणिक व माहितीपर होर्डिंग्जना अपवाद देण्यात यावा, अशी विनंती वराडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कर्हाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.
शैक्षणिक संस्थांच्या होर्डिंग्जचा उद्देश केवळ जाहिरात नसून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक आणि मार्गदर्शनाची माहिती देणे हा असतो.वराडकर महाविद्यालयातर्फे अशा केवळ चार ते पाच लहान व अल्पकालीन होर्डिंग्ज लावण्यात येतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्या अनुषंगाने प्रशासनाने याची दखल घ्यावी व शैक्षणिक हेतूच्या माहिती फलकांवर निर्बंध न आणता त्यांना अपवाद करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. कर्हाड यांनी केले आहे.www.konkantoday.com




