
मान्सूनच्या आगमनावर शिक्कामोर्तब, समुद्र खवळल्याने किनार्यावर फेणीचे आगमन.
पावसाळ्यात समुद्र खवळला की लाटांमधून किनारपट्टीवर मातीच्या रंगाची फेणी म्हणजे फेस येण्यास सुरुवात होते. सध्या रत्नागिरी शहरानजिकच्या भाटे किनार्यावर ही फेणी दिसू लागल्याने मान्सूनच्या आगमनावर शिक्कामोर्तब झाले आहे.मान्सून सक्रिय झाला आणि वादळानंतर समुद्र खवळला की गर्द पिवळसर रंगाचे फेसाळ पाणी लाटांबरोबर किनार्यावर वाहत येते. त्याला स्थानिक मच्छिमार फेणी म्हणतात. या फेणीबरोबर काही मासे पुढे पुढे सरकत असतात. ही फेणी दिसू लागली की, पारंपारिक पागी मच्छिमार किनार्यावर पागताना दिसू लागतात. सध्या भाट्ये येथील किनार्यावर अशी फेणी दिसू लागली आहे.www.konkantoday.com