
घराचे रंगकाम करताना वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने एकजण गंभीर जखमी.
घराचे रंगकाम करताना वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने रंगकाम करणारा एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना २८ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली. तुकाराम केशव मिरजोळकर (रा. वडदहसोळ, ता. राजापूर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले आहे.गोंडेसखल रोड येथील एका घराचे रंगकाम तुकाराम मिरजोळकर करत होते. यावेळी त्यांच्या हातात असलेल्या ओल्या बांबूचा घराजवळील उच्चदाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाला. विजेच्या धक्क्याने ते लोखंडी रेलिंगवर पडून जखमी झाले. लगेच त्यांना लांजा ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आले. येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पो. नि. निळकंठ बगळे सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच महावितरण अधिकार्यांनीही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.www.konkantoday.com